वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एअरटेल, जिओ’चा ३६५ दिवसांचा जबदरस्त प्लान; एकदा पहाच
लाइफफंडा

वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एअरटेल, जिओ’चा ३६५ दिवसांचा जबदरस्त प्लान; एकदा पहाच

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक नागरिक वर्क फ्रॉम होम करत आहेत. त्यामुळे त्यांना जास्त डेटा चीही गरज भासते. ही गरज लक्षात घेऊन एअरटेल, जिओ आणि व्होडाफोन जास्त वैधता असलेले डेटा प्लान आपल्या युजर्संसाठी आणले आहेत. अशाच प्रकारे एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी विशेष प्लान आणले आहे. ज्यात प्लानमध्ये वर्षभराची वैधतेसह अनेक केवळ डेटा नव्हे तर कॉलिंग आणि एसएमएसचा सुद्धा समावेश आहे. हा एअरटेल आणि जीओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Airtel च्या या प्लानची किंमत १४९८ रुपये आहे. ३६५ दिवस या तुम्हाला या प्लानचे बेनिफिटचा वापर करू शकतात. या प्लानमध्ये एकूण मिळून २४ जीबी डेटा मिळतो. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० फ्री एसएमएस मिळते. अन्य बेनिफिट्स मध्ये यात एअरटेल एक्स्ट्रिम प्रीमियम, फ्री ऑनलाइन कोर्स आणि फास्टॅग खरेदीवर १०० रुपयांचा कॅशबॅक, मोबाइल एडिशन फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, फ्री विंक म्यूझिक आदी ग्राहकांना मिळते.

याशिवाय जिओ रिचार्ज केल्यानंतर १२९९ रुपयांत एकूण २४ जीबी डेटा मिळतो. Vi चा हा प्लान Airtel पेक्षा १ रुपये जास्त आहे. १४९९ रुपयांत तुम्हाला २४ जीबी डेटा प्लस ३६०० एसएमएस प्लस अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिले जाते. याची वैधता ३३६ दिवस पर्यंत आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि ३६०० एसएमएस दिले जातात. या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे.