भारतात ५ जी नेटवर्क सुरु करण्यासाठी एअरटेल’चा मोठा निर्णय
लाइफफंडा

भारतात ५ जी नेटवर्क सुरु करण्यासाठी एअरटेल’चा मोठा निर्णय

भारतात 5G Network Service कधीपर्यंत सुरू होणार आहे. असा प्रश्न प्रत्येक मोबाइल आणि इंटरनेट युजर्सना विचारत आहेत. तर सध्या ६० हून जास्त देशात ५ जी सर्विस सुरूही झाली आहे. मात्र १.३५ अब्जच्या लोकसंख्येच्या देशात भारतात अद्याप ५ जी सर्विस सुरू करण्यात आली नाही. विशेष म्हणजे चीन आणि अमेरिका सारख्या देशात आता 6G नेटवर्क सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याच दरम्यान एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टेलिकॉम कंपनी एअरटेलने भारतात ५ जीची टेस्टिंग केली आहे. सरकारकडून याला मंजुरी मिळाल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे भारतातही ५ जी नेटवर्कची सुरुवात लवकरच केली जाणार असल्याच्या चर्चा आता सुरु झाल्या आहेत. एअरटेल क्वॉलकॉमच्या Radio Access Network platformचा वापर करून लोकांना ५ जी ची सुविधा देणार आहे. या बाबत एअरटेल क्वॉलकॉममध्ये करार करण्यात आला आहे. एअरटेल क्वॉलकॉमच्या मदतीने भारतात ५ जी सर्विस सुरू करणार आहे. तसेच यासोबतच 5G Fixed Wireless Access देण्यासाठी क्वॉलकॉम मोठी भूमिका बजावणार आहे.

दरम्यान, भारतात आगामी काही दिवसांत ५ जी नेटवर्क सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहे. भारतात आगामी काही महिन्यात ५ जी नेटवर्क सुरू केलेले दिसणार आहे. एअरटेल, रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, बीएसएनएल सह अन्य टेलिकॉम कंपन्या भारतात ५ जी सर्विस सुरू करू शकते.यात स्पेक्ट्रम लिलाव, लायसेन्स, आणि टेस्टिंग सह अन्य आवश्यक पूर्तता करण्यात येणार आहे.

क्वॉलकॉम ही अमेरिकेची प्रसिद्ध कंपनी आहे. जे टेलिकॉमचे उपकरण बनवते. भारतातील लोकांना चांगली ५ जी सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. एअरटेल भारतात Qualcomm 5G RAN प्लॅटफॉर्मचा वापर करून RAN बेस्ड 5G नेटवर्क सुरू करणार आहे. याच्या मदतीने घरात आणि ऑफिसात हाय स्पीड ५ जी सेवा सुरू करणार आहे. क्वॉलकॉमच्या प्रोसेसरची जगभरातील स्मार्टफोन्ससाठी मागणी आहे. आता एअरटेल आणि क्वॉलकॉमची पार्टनरशीप करण्यात आली आहे.