लाइफफंडा

अ‍ॅमेझॉन अलेक्साचा बदलणार आवाज; ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याचे ऐकायला मिळणार शब्द

नवी दिल्ली : अॅमेझॉन अलेक्साला थोड्याच दिवसात मोठी प्रसिद्धी मिळाली होती. आता अलेक्साने नवीन एक भन्नाट फीचर आणलं आहे. अ‍ॅमेझॉन अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड करण्यात येणार आहे. अमिताभ यांचा आवाज आता थेट अ‍ॅलेक्साच्या माध्यमातून सर्वांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. आता अमिताभ यांचा आवाज अ‍ॅमेझॉन अ‍ॅलेक्सावर ऐकायला मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अ‍ॅमेझॉनने अमिताभ बच्चन यांच्यासोबत करार केला आहे. अ‍ॅमेझॉनच्या व्हॉइस असिस्टंट सर्व्हिसने अ‍ॅमेझॉन अलेक्सासाठी पहिल्यांदाच भारतीय कलाकाराच्या आवाजाची निवड केली आहे. बच्चन अलेक्सा असे या नविन फीचरचे नाव ठेवण्यात आले आहे. बच्चन अलेक्सा 2021 पासून ग्राहकांना वापरता येणार आहे. यामध्ये अमिताभ बच्चन यांच्या आवाजात जोक, हवामानासंदर्भात माहिती आणि कविता ऐकता येणार आहेत. यासाठी ग्राहकांना काही रक्कम भरावी लागणार आहे. Alexa say hello to Mr. Amitabh Bachchan या व्हाइस कमांडच्या मदतीने ही सुविधा अ‍ॅक्टीव्हेट करता येणार आहे.

टेक्नॉलॉजीमुळे मला नेहमीच नविन गोष्टींसोबत जोडण्याची संधी दिली आहे. या नवीन टेक्नॉलॉजीमुळे आणखी लोकांपर्यंत मला पोहोचता येईल याचा मला विशेष आनंद आहे, असं या कराराबद्दल बोलताना अमिताभ बच्चन यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा :
– दिल्ली हिंसाचार प्रकरणी उमर खालिदला अटक; कोण आहे उमर खालिद?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत