दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?
लाइफफंडा

दुधी भोपळा खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

दुधीभोपळ्याची भाजी खायला अनेकांना आवडते तर काही जण भाजीला पाहूनच नाक मुरडतात. पण आज आम्ही तुम्हाला दुधी भोपळा खाण्याचे फायदे सांगणार आहोत. दुधी भोपळा हा अत्यंत गुणकारी असून त्याच्या सेवनामुळे अनेक शारीरिक तक्रारी दूर होतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुधी भोपळयाला उकळवा आणि त्यात मीठ घाला, यामुळे वजन सहजतेने कमी होते. स्थूल व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी रोज संध्याकाळी जेवणापूर्वी दुधीचे सूप दररोज प्यावे, यामुळे तुमचा लठ्ठपणा कमी होईल. दुधीचा रस केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर शरीरातील उष्णता दूर करण्यासही मदत करतो.

दुधी भोपळयामध्ये साखरेचे प्रमाण कमी आहे,यामुळे मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. दुधी भोपळयाचा रस किंवा दुधी भोपळयाची भाजी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे.

चेहऱ्याची बहुतेक समस्या स्पष्ट रक्ताच्या अभावामुळे होते. रोजच दुधी भोपळयाचा रस घेतल्याने तुमचे रक्त शुद्ध होते, जे तुमच्या पोटाच्या समस्याही दूर करते, रक्त स्वच्छ करते आणि आपल्या चेहऱ्यावर चमक ठेवते. आणि चेहऱ्यावर मुरुम किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास ती देखील दूर होते.

शांत झोप येत नसेल तर अशा वेळी दुधी भोपळ्याच्या रसाने तयार केलेले तेल डोक्याला व तळपायाला लावावे.