थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या या मागची कारणे आणि उपाय
लाइफफंडा

थंडीमध्ये हार्ट अटॅकचा धोका सर्वाधिक, जाणून घ्या या मागची कारणे आणि उपाय

जसं जसं तापमान कमी होऊ लागतं तसं तसं शरीर आवश्यक अवयवाचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी आपत्कालीन प्रतिसाद दल सक्रिय करतं त्यातूनच हृदयविकाराचा ( Heart Attack ) धोका सुरू होतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अनेक जणांसाठी हिवाळा आनंददायी असतो. बर्फाच्छादित डोंगर पाहून त्यांना नक्कीच भुरळ पडते, पण त्याचे धोकेही काही कमी नाहीत.सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तापमान घट होताच शरीरात अनेक बदल सुरू होतात. कारण आपलं शरीर एका ठराविक तापमानात संतुलित राहत.जसं जसं तापमान कमी होऊ लागतं तसं तसं शरीर आवश्यक अवयवाचा तपमान संतुलित ठेवण्यासाठी आपातकालीन प्रतिसादल सक्रिय करतं. त्यातूनच हृदयविकाराचा धोका सुरू होतो.

हिवाळ्यामध्ये शरीरात अनेक प्रकारचे बदल होत असतात. हिवाळ्यात विशिष्ट तापमान कायम राहावं यासाठी संरक्षणात्मक व्यवस्थापन म्हणून शरीरातील कॅटेगोलामाईन्सची पातळी वाढते. त्यामुळे ब्लड प्रेशर वेगानं वाढतं. यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक होण्याची शक्यता खूप वाढते. ही जोखीम प्रामुख्याने हृदयाशी संबंधित समस्या असणाऱ्या लोकांमध्ये अधिक असते.

हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का वाढत?
हिवाळ्यामध्ये तापमानात घट झाल्याने शरीर संतुलन बिघडतं,यामुळे शरीरावरचा अनावश्यक ताण वाढतो. जेव्हा शरीरावरचा अनावश्यकत ताण वाढतो आणि भीती निर्माण होते तेव्हा कॅटकोलमाईन्स शरीराला अशा परिस्थितीशी लढण्यासाठी तयार करतात. अड्रीनल ग्रंथी तणावाच्या स्थितीला तोंड देण्यासाठी पुरेशा प्रमाणात कॅटेकोलमाईन्स तयार करतात. कॅटॅकोलमाईन्सचे प्रामुख्याने तीन प्रकार असतात यात epinephrine ॲड्रीनेलीन, Norepinephrine आणि dopamine यांचा समावेश होतो. जेव्हा शरीरामध्ये कॅटेकोलामाईन्सचं प्रमाण वाढतं तेव्हा हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर आणि श्वासाची गती सुद्धा वाढते. त्यामुळेच हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक म्हणजेच पॅरलेसिस ची जोखीम सुद्धा वाढते.

आहार आणि शिथिलता (आळस ) ही प्रमुख कारण –

हिवाळ्यात अनेकांचा आहार अचानक वाढतो. दिवस लहान असल्याने लोक फिरणं टाळतात.व्यायामाचे प्रमाण कमी होतं. एकूणच शारीरिक हालचाली कमी होतात यामुळे कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर वाढू लागतं. काही जणांचं वजन देखील वाढू लागतं. उन्हाळ्यात शारीरिक हालचालीमुळे घाम येतो आणि घामाद्वारे सोडियम तसेच पाणी बाहेर पडतं. हिवाळ्यात शारीरिक हालचाली पुरेशां प्रमानात न झाल्याने सोडियम बाहेर टाकले जात नाही. त्यामुळे पेरीफेरेल रक्तवाहिन्या आकुंचन पावू लागतात.. परिणामी हृदयावरचा दबाव वाढतो आणि त्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकची जोखीम देखील वाढते.

हिवाळ्यामध्ये या व्यक्तींना असतो हार्ट अटॅकचा धोका??
ज्यांना हृदयविकार आहे म्हणजेच पूर्वी हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आला आहे त्यांना हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता अधिक असते. याशिवाय हायपर टेन्शन चा (BP) त्रास असणाऱ्या व्यक्तींना देखील हिवाळ्यात काळजी घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ नागरिकांनीहि हिवाळ्यात हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांनी देखील पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे.

यापासून बचावासाठी काय काळजी घ्यावी?

सर्वप्रथम थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवावे. हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामुळे खाण्यावर स्वनियंत्रण आवश्यक आहे. खास करून ज्यांना हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते त्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि आहार मर्यादित ठेवावा. थोड्या थोड्या वेळाने थोडं खावं. थंडी असताना घराबाहेर पडण टाळावं. अत्यावश्यक असेल तर उबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडावं. हिवाळा आहे दिवस लहान आहे म्हणून शारीरिक हालचाली मर्यादित ठेवू नयेत. नियमित पुरेसा व्यायाम करावा.

आहारामध्ये कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ नसावेत. तूप आणि तेलाचा वापर कमी करावा. तूप शरीरातलं तापमान कायम राखण्यास मदत करतं. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या भरपूर खाव्यात.जेवनामध्ये सलादच प्रमाण जास्त घ्यावे, जसे कि गाजर, काकडी, पत्ता गोबी, बिट, टमाटे, मुळा ई. हंगामी भाजीपाला आणि फळ खावीत.तसेच ड्रायफूटच ही सेवन मर्यादित प्रमाणातच करावं. तहान लागेल तितकंच कोमट पाणी प्यावे,तसेंच हृदयरोग टाळण्यासाठी कमीत कमी 6 ते 7 तास शांत झोप आवश्यक आहे.हि माहिती भगवती ECP, चिलेशन थेरपी चे डॉक्टर डॉ विलास धर्माधिकारी यांनी दिली आहे..

Dr VILAS DHARMADHIKARI,
B. A. M. S, P. P .H. C ,
FELLOWSHIP IN PREVENTIVE CARDIOLOGY (MUHS),
M. B. A. IN HEALTH CARE SERVICES
भगवती ई. सी. पी, चिलेशन थेरपी सेंटर,
भगवती मॅटरनिटी हॉस्पिटल, शिवाजीनगर
नांदेड.