BSNLकडून १२ जबरदस्त पोस्टपेड डेटा अॅड ऑन प्लानची घोषणा ; एकदा पहाच
लाइफफंडा

BSNLकडून १२ जबरदस्त पोस्टपेड डेटा अॅड ऑन प्लानची घोषणा ; एकदा पहाच

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने आपल्या युजर्ससाठी जबदरस्त प्लान आणला आहे. हा प्लान पोस्टपेड प्लान वापरत असलेल्या ग्राहकांसाठीच असणार आहे. तसेच तुम्हाला जर मोबाइल डेटाचा वापर जास्त हवा असेल तर तुमच्यासाठी बीएसएनएलने १२ डेटा अॅड ऑन प्लानची घोषणा केली आहे. ज्यात तुम्हाला रेग्युलर प्लानवरून अतिरिक्त टेडा मिळू शकतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बीएसएनएल युजर्ससाठी कोण कोणते नवीन डेटा अॅड प्लान आहे. अन्य टेलिकॉम कंपन्या आपल्या पोस्टपेड युजर्ससाठी केवळ २ डेटा अॅड ऑन प्लान ऑफर करीत आहे. तर बीएसएनएल युजर्संसाठी खूप सारे डेटा अॅड ऑन प्लान्स आहे.

BSNL पोस्टपेड डेटा अॅड ऑन प्लानची किंमत ५० रुपयांपासून सुरू होते. ज्यात युजर्संना ५५० एमबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 40 Kbps होते. हा डेटा अॅड ऑन प्लान आहे. युजर्संना व्हाइस कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्स मिळत नाही.

यानंतर बीएसएनएलचा ७५ रुपयांचा प्लान आहे. ज्यात १.५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 40 Kbps होते. १७० रुपयांच्या डेटा अॅड ऑन प्लानवर युजर्संना २.२ जीबी डेटा मिळतो. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 40 Kbps होते.

BSNL पोस्टपेड डेटा अॅड ऑन मध्ये २२५ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ४.२ जीबी डेटा मिळतो. याची स्पीड संपल्यानंतर स्पीड 40 Kbps होते. या प्लानमध्ये कॉलिंग किंवा एसएमएस बेनिफिट्स मिळत नाही. २४० रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना ३.५ जीबी डेटा मिळतो.

बीएसएनएलचच्या १७११ रुपयांच्या डेटा प्लानमध्ये युजर्संना ३० जीबी डेटा मिळतो. या सर्वासोबत बीएसएनएलने ३६५ दिवसांचा वार्षिक प्लान सुद्धा आणला आहे ज्यात युजर्संना महिन्याला १ जीबी म्हणजेच एकूण १२ जीबी डेटा मिळतो.

BSNL पोस्टपेड डेटा अॅड ऑन प्लानमध्ये ६६६ रुपयांच्या प्लानसोबत ११ जीबी डेटा मिळतो. तर ९०१ रुपयांच्या प्लानमध्ये युजर्संना २० जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 128 Kbps होते. मेसेज पाठवण्यासाठी आणि सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी ही स्पीड पुरेशी आहे.