Stale-Food
लाइफफंडा

शिळे अन्न गरम करून खाऊ नका; कारण…

पुणे : अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हटले जाते. अन्नासाठी लोक वाट्टेल ते करतात आणि आपली भूक भागवतात. तर काही लोक अन्नाची नासाडी नको म्हणून उरलेले शिळे अन्न खातात. पण हे करणं आरोग्यास हानीकारक ठरू शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिळे अन्न गरम करून खाल्ल्याने केवळ आपले पोट भरते. परंतु आपण निरोगी राहू शकत नाही. असे काही पदार्थ आहेत जे आपण त्यांना पुन्हा गरम करून खाल्ल्यास ते आपल्याला आजारी पाडू शकतात. पुन्हा गरम करून खाणे कोणते पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात ते जाणून घेऊ…

पालेभाज्या खाऊ नये गरम करून

पालेभाज्या गरम करून खाल्यास खूप धोकादायक ठरू शकतात. पालक गरम करून खाल्ल्याने कर्करोग होऊ शकतो. त्यामध्ये असलेल्या नायट्रेट्स गरम केल्यावर विषारी घटकांमध्ये रुपांतरीत होतात. ज्यामुळे काही काळानंतर कर्करोगाचा धोका संभवतो.

बटाटा ठरू शकतो हानिकारक

आपल्या प्रत्येकाच्या जेवणात बटाटा असतो. बटाटा आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु जर तुम्ही ते पुन्हा गरम करून खाल्ले तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. गरम अन्न पचनावर वाईट परिणाम करते.

शिळा भातही खाऊ नये

शिळा भात गरम करुन खाल्ल्याने विषबाधास होऊ शकते. भातामध्ये बॅसिलस सेरियस नावाचा अत्यंत प्रतिरोधक बॅक्टेरियम आढळतो, जो अन्न विषबाधा होण्यासाठी जबाबदार आहे.

दरम्यान, वरील दिलेली सर्व बाबी या माहितीसाठी आहेत. याचा कोणताही विचार किंवा वापर करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत