Seasonal-Flu
लाइफफंडा

सीजनल फ्ल्यूपासून अशी घ्या काळजी…

नवी दिल्ली : पावसाळ्यात अनेक आजार होत असतात. पण त्यापासून वाचताही येऊ शकते. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचे आहे. रोगांच्या यादीमध्ये सर्वात वरच्या स्थानावर सीझनल फ्लू किंवा सीझनल इन्फ्लूएंझा या आजाराचे नाव असते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एनसीबीआयच्या माहितीनुसार, २०१९ मध्ये २८७९८ लोकांवर एकाच प्रकारच्या सीझनल फ्लूमुळे (एच1 एन1) परिणाम झाला होता आणि आजही लहान मुलांसाठी हा एक मोठा धोका आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये 5 वर्षांखालील मुलांना इन्फ्लूएन्झा होण्याची शक्यता तीन पटीने जास्त आहे. या समस्येचा सामना करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे वेळेवर लसीकरण करणे.

सीझनल इन्फ्लूएन्झामुळे तुमच्या श्वसन यंत्रणेवर परिणाम होतो. यापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे. जसे की शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक झाकणे, वापरलेल्या टिशू पेपरची योग्यरित्या व्हिलेवाट लावणे, इन्फ्लूएंझा विषाणूच्या संपर्कात आल्यास लवकरात लवकर बरे होण्यासाठी स्वतःचे विलगीकरण करून घेणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत