सोने चांदीच्या दरात वाढ; पाहा आजचे दर
लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात वाढ; पाहा आजचे दर

नवी दिल्ली : दिल्लीतील सराफा बाजारात 11 फेब्रुवारी 2021 रोजी सोन्याचे दर किरकोळ वधारले आहेत. आज चांदीच्या दरात देखील वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा 36 रुपये तर चांदीच्या दरात प्रति किलो 454 रुपयांची वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरात एकूणच वाढ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातील सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. चांदीचे दर मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात स्थिर आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजने सोन्याचांदीच्या किंमतीबाबत ही माहिती दिली आहे. आधीच्या सत्रामध्ये सोन्याचे दर प्रति तोळा 47 हजार 473 रुपये किंमतीवर ट्रेड करत होते. तर चांदी 68 हजार 576 रुपये प्रति किलोग्रॅम होती. यामध्ये आज वाढ झाली.

दिल्लीतील सराफा बाजारात सोनं प्रति तोळा 36 रुपयांनी महाग झालं असून या वाढीनंतर 99.9 शुद्धतेच्या सोन्याची किंमत 47 हजार 509 रुपये प्रति तोळा झाली आहे. याआधीच्या सत्रात बुधवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 47 हजार 473 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वाढून 1 हजार 861 डॉलर प्रति औंस आहेत. सोन्याप्रमाणेच चांदीमध्येदेखील वाढ झाली आहे. चांदी 454 रुपये प्रति किलोने महाग झाली आहे. यानंतर चांदीचे दर प्रति किलो 69 हजार 030 रुपये झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव 27.18 डॉलर प्रति औंसवर पोहोचले होते.