सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?
लाइफफंडा

सोने-चादींच्या दरात सातत्याने घसरण; काय आहे कारण?

नवी दिल्ली : सोने चांदीचे दर मागील काही दिवसांत गगनाला भिडले होते. पण सध्या सोने-चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी स्पॉट मार्केटसहीत फ्युचर्स मार्केटमध्येही सोन्या-चांदीचे भाव नरम राहिले. यासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीची घसरण दिसून येतेय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सोमवारपर्यंत सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ४८३ रुपये आहे. आधीच्या व्यापार सत्रापेक्षा हे १४२ रुपयांनी कमी होते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचा भाव सरासरी १,७८१, ५० डॉलर होता. सोन्याच्या दराप्रमाणे चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. चांदीचा आजचा भाव ५७ हजार ८०८ रुपये आहे. याआधी चांदीचा भाव ५८ हजार ५०९ रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाले. आधीच्या व्यापारी सत्राच्या तुलनेत चांदी ७०१ रुपयांवर घसरली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची घसरण सुरुच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी २२.२९ डॉलर पर्यंत आहे.

काय आहे कारण ?
सोन्या-चांदीच्या उतरत्या भावाचे कनेक्शन हे कोरोना वॅक्सीनच्या आगमनाशी जोडण्यात येत आहे. कोरोना लसीबद्दल येणाऱ्या बातमीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. कोरोना वॅक्सीन लवकर येईल अशी शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार अधिक जोखीम घेत आहेत. येणाऱ्या काही दिवसात सोन्याच्या किंमती वाढतील असा अंदाज दिसत नाही.