सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर
लाइफफंडा

सोने चांदीच्या दरात पुन्हा चढ-उतार; जाणून घ्या आजचे दर

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता प्रत्येक दिवशी दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोने चांदीचे भाव स्थिर राहत नसून यामध्ये दररोज बदल होत आहेत. शुक्रवारी चांदीच्या दरात 135 रूपयांची घसरण झाली असून प्रति किलोग्राम चांदीचे दर 66 हजार 704 रूपयांवर पोहोचले. तर शुक्रवारी सोन्याचे दर वाढले असून जवळपास प्रति ग्रामसाठी 45 हजार रूपये मोजावे लागत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूर्वीपेक्षा सोन्याचे दर कमी झाल्यामुळे बाजारात सोन्यासाठी मागणी वाढली आहे. सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली असून १० ग्राम सोनं विकत घेण्यासासाठी जवळपास 45 हजार रूपये मोजावे लागत आहेत. गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सतत वाढ नोंदवण्यात येत होतीं. पण आज मात्र सोन्याच्या दरात घरसण झाल्याचं दिसून येत आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे आजचे दर

शहर           22 कॅरेट         24 कॅरेट
मुंबई          44 हजार 240   45 हजार 60
पुणे            44 हजार 060   45 हजार 60
नवी दिल्ली  44 हजार 240    45 हजार 60
चेन्नई          42 हजार 480    46 हजार 340
केरळ         44 हजार 250    46 हजार 90