सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर
लाइफफंडा

सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मागील काही दिवसांपासून सातत्याने चढउतार झाल्याचे पाहायला मिळत आहेत. सराफा बाजारात सोने चांदीच्या किमती वधारल्या आहेत. शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याच्या किमतीत 0.23 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर सोन्याच्या जूनच्या वायद्याचे भाव 47,884 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत. चांदीच्या किमतीतही आज वाढ झाली आहे. चांदीचे दर 0.16 टक्क्यांच्या वाढीसह 69,329 प्रति किलोग्रॅमवर पोहोचले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एचडीएफसी सिक्यूरिटीजनुसार, गुरुवारी दिल्लीमध्ये सोन्याचे दर 168 रुपयांनी घसरुन 47,450 प्रति 10 ग्रॅमवर आले. तर, चांदीचे दर 69,117 रुपये प्रतिकिलो इतके झाले. सराफा बाजारात आज 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 0.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यानंतर जून वायद्याचे सोन्याचे भाव 47884 प्रति दहा ग्रॅमवर पोहोचले आहेत.

दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 46,650 प्रति दहा ग्रॅम आहे. चैन्नईमध्ये सोन्याचे दर 45,370 रुपयांपर्यंत घसरले आहेत. तर, मुंबईमधील भाव 45,250 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहेत. भारतात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा वाढलं आहे. यामुळे गुंतणुकदार सोन्याच्या खरेदीकडे वळताना दिसत आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या किमतीत वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्यानं येत्या काही दिवसात दरात तेजी पाहायला मिळू शकते.