गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ
लाइफफंडा

गुड न्यूज : आता फेसबुकवरही बनवता येणार टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ

नवी दिल्ली : फेसबुक प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता फेसबुकवर टिकटॉकसारखे शॉर्ट व्हिडिओ बनवता येणार आहेत. सोशल मीडिया फेसबुकने आता फेसबुक रील्स (Facebook Reels) फीचर अधिकृतपणे भारतात लाँच केले आहे. इतकेच नव्हे तर काही इंस्टाग्राम क्रिएटर्सला आपली रील्स थेट फेसबुकवर शेयर करण्याची सुविधा मिळणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात अनेक चीनी अनुप्रयोगांवर (अॅप्स) बंदी घालण्यात आल्यानंतर लोकांची करमणूक व्हावी यासाठी इंस्टाग्रामवर रिल्स सुरू करण्यात आले आहे. फेसबुकने टिकटॉक सारखे छोटे व्हिडिओजला रील्स नाव दिले आहे. फेसबुक रील्स एकदम Instagram Reels सारखे आहे. या फीचर द्वारे युजर्स काही सेकंदाचे व्हिडिओज बनवून ते शेयर करू शकतात. युजर्स फेसबुक म्यूझिक लायब्रेरीमधून कोणतेही साँग सिलेक्ट करू शकतील. वेगवेगळे व्हिडिओ बनवून ते वेगवेगवळे इफेक्ट देऊन एक टाइमर सेट करू शकतील. यात व्हिडिओच्या स्पीडला कमी करू शकता येते.

या नवीन फीचर द्वारे फेसबुक भारतात शॉर्ट व्हिडिओच्या क्रेझला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे ज्याला टिकटॉकने सुरू केले होते. टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर कंपनीने इंस्टाग्राम रील्स सुरू केले होते. भारतात युजर्सला Reels नावाने एक वेगळे टॅब मिळते. याची सुरुवात भारतातून झाली आहे. तसेच Instagram Lite अॅप र सुद्धा हे फीचर सर्वात आधी भारतीय युजर्सला दिले होते.

कंपनी फेसबुक आणि इंस्टाग्राम रील्स ला सध्या वेगवेगळे ठेवणार आहे. फेसबुक रील्सला केवळ फेसबुक न्यूज फीडवर शेयर करण्याचा पर्याय दिला आहे. याचपद्धतीने इंस्टाग्राम रील्स त्या अॅपवर शेयर करू शकतील. केवळ निवडक क्रिएटर्स असतील त्यांना इंस्टाग्राम रील्सला फेसबुकवर शेयर करण्याची परवानगी दिली जाईल. मात्र ही सुविधा सर्व युजर्ससाठी कधीपर्यंत उपलब्ध होईल. यासंबंधीची माहिती अद्याप दिली नाही.