लाइफफंडा

होय, तुमची ओळख सांगतंय तुमचं हस्ताक्षर!

पुणे : हस्तलेखन म्हणजेच हस्ताक्षर. हाताने लेखण केलेल्या मजकूराला हस्ताक्षर म्हटलं जातं. हे लिखाण प्रामुख्याने हाताच्या मदतीने मेंदूच्या माध्यमातून केले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या लिखाणात  एक वैशिष्ट्य असते आणि  एकच व्यक्तीच्या हस्तलिपीत दुर्बलता, घाईगडबड, उत्तेजना अथवा आजारामुळे परिवर्तन येऊ शकते. याच हस्ताक्षरातून तुमची ओळख समजू शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हस्ताक्षरावर आधारित पहिले पुस्तक इटलीच्या मॅक्ली बाल्डी यांनी 1932 मध्ये लिहिले होते. अशाप्रकारच्या पुस्तकांच्या अध्ययनातून मानसशास्त्रीय, पोलिस, व्यापारी तसेच  सामाजिक कार्यकर्त्यांना अन्य व्यक्तींबाबत माहिती मिळवण्यात मदत मिळते. हस्तलेखनाचे महत्व स्पष्ट आहे. प्रत्येक व्यक्तींच्या हस्तलिपीमध्ये अक्षरांची गोलाई, लिहिताना दिला जाणारा दाब, लिहिण्याची गती यामध्ये भिन्नता आढळते.

एखादी व्यक्ती सरळ लिहिते याचा अर्थ, त्याच्या मेंदूचा प्रभाव हृदयावर असतो आणि अशा व्यक्ती स्वतंत्र, थंड आणि आत्मविश्वासू असतात. सहजपणे वाहवत नाहीत. त्या कल्पक आणि दूरदृष्टीच्या नसतात. मात्र, व्यवास्थित आणि  नियमितपणे कार्य करण्याची त्यांची सवय असते. काही व्यक्ती गोल, मोठे स्पष्ट आणि काही व्यक्ती छोटे, गुंतागुंतीचे, अस्पष्ट अक्षर लिहितात. लिखावटीत जोर देऊन किंवा हलक्या हाताने लिहितात. या पद्धतींचे सूक्ष्म विश्लेषण करून व्यक्तींच्या स्वभाव, मानसिकता आदीबाबात माहिती मिळवता येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत