एचटीसी डिजायर 21 प्रो 5 जी स्मार्टफोनचे लाईव्ह फोटो लीक, ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स
लाइफफंडा

एचटीसी डिजायर 21 प्रो 5 जी स्मार्टफोनचे लाईव्ह फोटो लीक, ‘हे’ आहेत जबरदस्त फीचर्स

नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी HTC सध्या आपला नवीन स्मार्टफोन डिझायर प्रो 21 5 जी (Desire Pro 21 5G )वर काम करत असून तायवानची दिग्गज टेक कंपनी लवकरच या फोनला लाँच करणार आहे. याआधी कंपनीने गेल्यावर्षी ५ जी नेटवर्क सपोर्टचा HTC U20 लाँच केला होता. या दरम्यान, अपकमिंग स्मार्टफोनचे काही लाइव फोटो लीक झाले आहेत. या लीक फोनमध्ये डिझाइनचा प्रत्येक अँगल दाखवण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एचटीसी U20 चे फीचर्स
एचटीसी यू २० या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ जी चिपसेट दिला आहे.

सेंटर पंच-होलचा डिस्प्ले
लीक फोटोतून एचटीसी डिझायर २१ प्रो ५जी च्या बॅक पॅनेलवर देण्यात आलेले टेक्सचर्ड डिझाइनला पाहिले जावू शकते.फोनची फ्रंट डिझाइन मध्ये सेंटर पंच होलचा डिस्प्ले पाहायला मिळू शकतो. फोनच्या राइट साइड मध्ये इंटिग्रेटेड फिंगरप्रिंट सेन्सरचा पॉवर सोबत एक व्हॅल्यूम रॉकर बटन दिले आहे.

४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा
लीक झालेल्या माहितीनुसार, हा एक ड्यूल सिम फोन असणार आहे. याचे मॉडल नंबर ‘2QAG100’ आहे. फोन प्री इंस्टॉल्ड अँड्रॉयड १० ओएससोबत येईल. फोनचे अन्य फीचर्स संबंधी काही माहिती समोर आली नाही. पण फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये बॅक पॅनेलवर रेक्टांगल शेप कॅमेरा मॉड्यूल आणि एलईडी फ्लॅश सोबत चार रियर कॅमेरे दिले आहेत. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे.