जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच
लाइफफंडा

जीओच्या ‘या प्लानमध्ये मिळतोय २५२ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग; एकदा पहाच

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान आणत असते. कंपनीकडे असाच एक प्लान आहे ज्यात ८४ दिवसांची वैधता मिळते. कंपनीकडे ९९९ रुपयांचा प्लान आहे. यात ३ जीबी डेटा मिळतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लानसंबंधी सर्वकाही माहिती सांगणार आहोत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

555 रुपये रिचार्ज पॅक
जिओ 555 च्या पॅकची वैधता 84 दिवसांची आहे. यात दररोज 1.5 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, ग्राहक एकूण 126 जीबी हाय-स्पीड डेटाचा लाभ घेऊ शकतात. रोज मिळणाऱ्या डेटाची स्पीड कमी होवून 64Kbps होते. ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉल, दररोज 100 एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा या प्लानमध्ये मिळते.

999 रुपयांचा जिओ रिचार्ज पॅक
रिलायन्स जिओच्या 999 रुपयांच्या रिचार्ज पॅकवर दररोज 3 जीबी डेटा देण्यात येतो. पॅकची वैधता 84 दिवसांची आहे. म्हणजेच ग्राहक एकूण 252 जीबी डेटा वापरू शकतात. दररोज डेटा संपत गेल्यानंतर इंटरनेटचा वापर 64 केबीपीएस वेगाने केला जाऊ शकतो. व्हॉईस कॉलिंगसाठी ग्राहकांना अमर्यादित मिनिटे मिळतात. दररोज 100 एसएमएस देखील विनामूल्य पाठविले जाऊ शकतात. ग्राहकांना जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा या प्लानमध्ये मिळते.