लाइफफंडा

दिवाळीला मारुती कारच्या खरेदीवर बंपर ऑफर; तब्बल एवढ्या रुपयांचा डिस्काउंट

मुंबई : दिवाळीच्या सणाला मारुती या मोटार कंपनीने कार खरेदीवर भरघोष ऑफर दिल्या आहेत. दिवाळीच्या सणात मारुती कारवर मोठी बंपर ऑफर मिळणार आहे. वेगवेगळ्या मॉडेलवर वेगवेगळ्या ऑफर देण्यात आल्या आहेत. ऑटो पोर्टल झिगव्हील्समध्ये अहवालात या ऑफरविषयी सर्व माहिती देण्यात आली आहे. ५५,००० रुपयांपर्यंत ही ऑफर मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अरेना आणि नेक्सा मॉडेलवर ५५ हजारांचे डिस्काउंट मिळणार आहे. तर अल्टो सह मारुती एस-क्रॉस या कारवरही ऑफर आहे.
————-
आणखी वाचा :
अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी हृतिक रोशनचा पुढाकार
————-
मराठी व्याकरणाला तर्कशुद्ध करणारे तर्खडकर
————-

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मारुती एस-प्रेसो
कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कंज्यूमर ऑफर्स मिळून एकूण ४८ हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. एस-प्रेसो ३.७० लाख ते ५.१३ लाखादरम्यान उपलब्ध आहे. सीएनजी आणि पेट्रोल दोन्हींसाठी ही ऑफर आहे.

मारुती इग्निस
इग्निसची किंमत ४.८९ लाखांपासून सुरु होते. ती ७.१९ लाखांपर्यंत आहे. सेकेंड टू टॉप झेटा मॉडेलवर १० हजार रुपयांची कॅश डिस्काउंट मिळत आहे. तर मारुतीच्या बाकी सर्व मॉडेल कारवर ५० हजार रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे.

मारुती सेलेरिओ
सेलेरिओ एक्ससहीत सर्व मॉडेल्सवर डिस्काउंट मिळत आहे. हे डिस्काउंट ५३ हजार रुपये आहे. या कारची किंमत ४.४१ लाखांपासून ५.६८ लाखांपर्यंत आहे.

मारुती वॅगन आर
मारुतीची सर्वात मोठी प्रसिद्ध हॅचबॅकवर ४०,००० रुपयांचे सवलत मिळत आहे. डिस्काउंट पेट्रोल आणि सीएनजी दोन्हींसाठी उपलब्ध आहे. या कारची किंमत ४.४५ ते ५.९५ लाखांच्या दरम्यान आहे.

मारुती विटारा ब्रेझा
मारुती विटारा ब्रेझावर ४५,००० रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. या कारची किंमत ७.३४ लाखांपासून ११.४० लाखांच्या घरात आहे.

मारुती बालेनो
मारुती बालेनोच्या सर्व व्हॅरिएंट्सवर ३३,००० रुपयांची सवलत मिळत आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ५.६३ लाखापासून सुरु आहे. ८.९६ लाखांपर्यंत किंमत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत