वयाच्या 59 व्या वर्षी देखील नीता अंबानी खरचं सुंदर दिसतात. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीला लाजवेल असे त्याचे सौदर्यं आहे. नीता अंबानींच्या सौंदर्यापुढे सर्वकाही फिके पडलेले वाटते. नीता अंबानींचा फॅशनसेन्स देखील खूपच सुंदर आहे. अनेक जण नीता अंबानींच्या सौदर्यांचे रहस्य जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. पण नीता अंबानी फार कोणाला मुलाखती देत नाहीत. अशात आयपीएल सामन्यासाठी इंदूरमध्ये असताना त्या ज्या हॉटेलमध्येल राहत होत्या त्या हॉटेलमधील शेफची मुलाखत घेण्यात आली होती. त्याच्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
हिरव्या भाज्यांचे सेवन
या मुलाखतीमध्ये शेफने सांगितले की त्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हिरव्या भाज्यांचे सेवन करतात. त्याचप्रमाणे त्या भाज्यांच्या रसचे सेवन करतात. ताज्या भाज्या हाच नीता अंबानी यांचा मुख्य आहार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
डिटॉक्स वॉटर
त्वचा तेजस्वी ठेवण्यासाठी भाज्या आणि फळांप्रमाणे डिटॉक्स वॉटर खूप मोठ्या प्रमाणात मदत करते. तुमच्या शरीराला लागलेल्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही आरोग्य समस्यांपासून संरक्षण मिळण्यासाठी डिटॉक्स वॉटर मदत करते. तुम्ही
टरबूज आणि रोझमेरी, लिंबू, संत्री आणि स्ट्रॉबेरी किंवा काकडी वापरून डिटॉक्स ड्रिंक तयार करु शकता. डिटॉक्स ड्रिंकमुळे तुमच्या चायापचनाची क्रिया चांगली होते.
बीटरूट रस
नीता अंबानी नेहमीच पारंपारिक पद्धतीला प्रधान्य देतात. त्यामुळेच त्या नेहमी बीटरुट ज्यूस पितात. बीटमध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील हिमोग्लोबिन सुधारण्यास मदत करतात. याचा फायदा तुमच्या त्वचेला होऊ शकतो. चेहऱ्यावर तेजी आणण्यासाठी तुम्ही बीटरुटचा वापर करु शकता.
पालक रस
पालक तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे हिरव्यागार पालकाचा वापर करुन तुम्ही तुमचे वजन कमी करु शकता त्याचप्रमाणे यागोष्टीचा फायदा तुम्हाला नितळ त्वचा मिळवण्यासाठी देखील होऊ शकतो.
मल्टीग्रेन ब्रेड
तुमच्या त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी तुम्हाला भरपूर फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे. फळांमध्ये भरपूर फायबर असते. मल्टीग्रेनचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही मल्टीग्रेन ब्रेडचे सेवन देखील करू शकता. मल्टीग्रेन ब्रेडमुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते.