पेटीएम’ची मोठी ऑफर; प्रत्येक रिचार्जवर १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस
लाइफफंडा

पेटीएम’ची मोठी ऑफर; प्रत्येक रिचार्जवर १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस

नवी दिल्ली : डिजिटल फायनान्शियल सर्विस प्लेटफॉर्म पेटीएमने मोबाइल रिचार्जसह अन्य पेमेंटवर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स ची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत मोबाइल रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर ग्राहकांना आकर्षक कॅशबॅक आणि अन्य दुसरे बक्षीस दिले जाणार आहेत. नवीन युजर्स ३ पे ३०० कॅशबॅक ऑफरचा फायदा घेऊ शकतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हे ऑफर्स प्रीपेडच्या सर्व आणि पोस्टपेडच्या बिल पेमेंट्सवर लागू होणार आहेत. यात रिलायन्स जिओ, वोडाफोन आयडिया, एअरटेल, बीएसएनएल आणि एमटीएनएलवर घेता येऊ शकते. या ठिकाणी पहिल्या तीन रिचार्जवर १०० रुपयांचे निश्चित कॅशबॅक मिळणार आहे. सध्याच्या युजर्संना प्रत्येक रिचार्जवर १ हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे.

जर कोणी युजर आपल्या फ्रेंड्स किंवा फॅमिली ला पेटीएमवर रिचार्ज सुरू करण्यासाठी इनवाइट करेल त्या दोघांना १०० रुपयांपर्यंत मिळणार आहे. तसेच रिचार्जवर आणि बिल पेमेंट्सवर बक्षीस मिळवण्यासाठी युजर्स कंपनीच्या रेफरल प्रोग्राम मध्ये अतिरिक्त कॅशबॅक मिळणार आहे. पेटीएमचे खास यात युजर्संना पोस्टपेड फीचर्सचा लाभ मिळणार आहे. याआधी रिचार्जवर पेमेंट करू शकतात. आपल्या युजर्सला आधीच मोठा दिलासा देणाऱ्या पेटीएमने मोबाइल रिचार्ज आणि बिल पेमेंट्स एक्सपीरियन्सला ३ क्लिक इंस्टंट रिचार्ज सारखे फीचर्स सोबत एन्हांस केले होते.