मुलांना जबदरस्ती जेवण भरवता? पण ही गोष्ट मुलांच्या आरोग्यासाठी घातक, कशी ती पाहा?
लाइफफंडा

मुलांना जबदरस्ती जेवण भरवता? पण ही गोष्ट मुलांच्या आरोग्यासाठी घातक, कशी ती पाहा?

लहान मुलांना जेवण भरवणं ही काही सामान्य गोष्ट नाही. अनेकदा असं होतं की, पालक मुलांना जेवण भरवतात पण मुलं एका जागी बसून जेवतच नाही. किंवा जेवण खायलाच खूप नखरे करतात. अशावेळी मुलांच्या या सवयीने पालक कंटाळून त्यांना जेवण जबरदस्ती भरवण्याचा प्रयत्न करतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अगदी मुलांना भरवताना ओरडतात कधी कधी तर मारतात देखील. मात्र पालकांनी कधी विचार केलाय का? की जबरदस्ती जेवण भरवल्याने मुलांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. मुलांना असं जबरदस्ती करून भरवल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो.

​मुलांच्या नैसर्गिक भूकेवर होतो विपरीत परिणाम
भूक लागणे ही शरीराची एक स्वाभाविक इच्छा असते. मुलांना ओरडून किंवा मारून भरवणं अजिबातच योग्य नाही. कारण यामुळे मुलांचा जेवणातील रस निघून जातो. यामुळे त्याला जेवणाच अजिबात महत्व राहत नाही. यामुळेच मुलांना जबरदस्ती जेवण भरवू नका. अनेकदा मुलं उल्टी देखील करतात. यामुळे खाल्लेला पदार्थ देखील बाहेर पडतो.

​इटिंग डिसऑर्डरची देखील जोखीम वाढते
जर तुमचे बाळ खात नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला भूक नाही किंवा त्याने कमी अन्न खाल्ले असेल तर त्याचे पोट भरले आहे. परंतु जर तुम्ही बाळांना जबरदस्तीने दूध पाजले तर ते मोठे झाल्यावर त्यांना जास्त खाण्याची सवय लागू शकते. यामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा, एनोरेक्सिया, बुलिमिया यासारखे खाण्याचे विकार देखील होऊ शकतात. त्यामुळे जबरदस्ती जेवणं भरवल्याचा उलटा परिणाम शरीरावर होऊ शकतो.

​पचनसंस्थेसंदर्भात समस्या निर्माण होतात
प्रत्येक बाळाची पचनसंस्था किंवा मेटाबॉलिज्म वेगळा असतो. त्यामुळे सारख्या वयाची मुलं देखील वेगवेगळ्या फरकाने जेवण जेवत असतात. अनेक मुलं ताटातील सर्व पदार्थ खातात तर काही मुलं जेवण सोडून देतात. तेव्हा पालक त्यांना पानातील सर्व पदार्थ खाण्याचा आग्रह करतात. त्यावेळी मुलाच्या भूकेपेक्षा त्याला अधिक प्रमाणात जेवण भरवलं जातं. यामुळे त्याची पचनसंस्था कोलमडते. याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत शकतो.

​मुलांना सुदृढ ठेवण्यासाठी कसं भरवाल जेवणं?
मुले आपल्या पालकांना पाहून अनेक गोष्टी शिकतात. प्रयत्न करा की, जेव्हा तुम्ही मुलाला खायला द्याल तेव्हा त्याच्यासोबत बसा आणि स्वतःच खा. त्यांना लहान जेवण द्या, परंतु त्यांना वारंवार खायला द्या. जर मुल अन्न नाकारत असेल तर त्याला जबरदस्ती करू नका. जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा ते स्वतःच तुम्हाला सांगू शकतात. जर तुम्ही बाळाच्या जेवणात काहीतरी नवीन पदार्थ देत असाल तर त्यामुळे मुलं नाराजही होऊ शकते. त्यामुळे नवीन पदार्थ देण्यापूर्वी त्याच्या स्वभावाचा किंवा त्यावेळेच्या मूडचा देखील विचार करा.