टाटाची सीएनजी स्वस्त आणि मस्त कार; 5000मध्ये होणार बुकिंग
लाइफफंडा

टाटाची सीएनजी स्वस्त आणि मस्त कार; 5000मध्ये होणार बुकिंग

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या चढ्या दरांमुळे सामान्य वाहनचालकांचे बजेट पूर्ण बिघडले आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक आणि सीएनजीवर चालणाऱ्या कार खरेदी करण्यावर भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अशात आता देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्स आपली बेस्ट सेलिंग हॅचबॅक कार टियागो लवकरच सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याआधी कंपनीने नवीन Tiago सीएनजीसाठी बुकिंग स्वीकारण्यास देखील सुरूवात केली आहे. केवळ पाच हजार रुपयांत बुकिग करता येऊ शकते. दिवाळीपर्यंत टाटा मोटर्सची नवीन Tiago सीएनजी लॉन्च होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच टाटा मोटर्सची नवीन Tiago सीएनजी ही कार टेस्टिंग दरम्यानही नजरेत आली. त्यावेळी Tata Tiago सीएनजी कारच्या फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबाबत माहिती लीक झाली आहे. त्यानुसार, कंपनीने ही नवीन सीएनजी कार सध्याच्या टियागोपेक्षा वेगळी दिसावी यासाठी एकदम नवीन बंपर, क्रोमसह नवीन फ्रंट ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप, एलईडी डीआरएल, आकर्षक एलईडी टेल लाइट्स असे फिचर्स दिले आहेत. तसेच, अॅपल कार-प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट होणारी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, वायपरसह रिअर डिफॉगर असे फीचर्सही या कारमध्ये मिळतील.

मिळालेल्या माहितीनुसार, टाटा टियागो सीएनजीमध्ये 1.2 लिटर रेवोट्रॉन इंजिन दिलं जाण्याची शक्यता आहे. हे इंजिन 85 बीएचपी पॉवर आणि 113 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय असेल. मार्केटमध्ये सध्या विक्री होत असलेली टियागो ही सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित कार असल्याचा कंपनी दावा करत आहे.