नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात? मग ही बातमी वाचाच
लाइफफंडा

नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात? मग ही बातमी वाचाच

नवी दिल्ली : तुम्ही नवीन मोबाईल घेण्याच्या विचारात आहात का? नवीन मोबाईल घेणार असाल तर हि बातमी तुमच्यासाठीच आहे. देशातील अनेक आपल्या हँडसेटच्या किंमतीत कपात केली आहे. यात रेडमी, विवो, सॅमसंग मोटो आणि वनप्लसने या स्मार्टफोन कंपन्यांचा समावेश आहे. रेडमी नोट ९, फ्लॅगशीप वनप्लस ८ आणि वनप्लस ८ प्रो च्या किंमतीत कपात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रेडमी ९ प्राइमच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. या फोनच्या ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किमत ९ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तर ४ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा फोन १० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता.

चीनी कंपनी वनप्लस ने देशात आपला OnePlus 8T हँडसेट लाँच केला आहे. फोनच्या ६८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला आता ४२ हजार ९९९ रुपये किंमतीऐवजी आता ३९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर याच्या टॉप एन्ड १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरियंटला देशात ४२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

विवो व्ही २० एसई स्मार्टफोनच्या किंमतीत सुद्धा कपात करण्यात आली आहे. फोनचे ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज फोन आता १९ हजार ९९० रुपयांत उपलब्ध आहे. हँडसेटला ऑफलाइन आणि ऑनलाइन मध्ये खरेदी करू शकता.

सॅमसंगने आपल्या Samsung Galaxy M31S या फोनच्या किंमतीत कपात केली आहे. आता या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला २० हजार ४९९ रुपयात खरेदी करू शकता. तर ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजच्या फोनला १८ हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकता.

रेडमी नोट १० सीरीजला देशात लाँच करण्यात आल्यानंतर रेडमी नोट ९ च्या दोन्ही व्हेरियंट्सच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. आता नोट ९ चा स्मार्टफोन ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबीच्या दोन्ही व्हेरियंट्सची किंमत कमी करण्यात आली आहे. हा फोन आता ११ हजार ९९९ रुपयांऐवजी १० हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकतो. ६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेजचा व्हेरियंटमध्ये १ हजार रुपयांची कपात करण्यात आल्यानंतर १३ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात.