लाइफफंडा

आठवडाभराच्या कामाने थकलात का? मग हा उपाय करून पाहाच

कामाचा ताण आणि आठवडाभराचा थकवा याचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. अशावेळी महिला फेशियलला प्राधान्य देतात. स्वस्थ आणि सुंदर राहणे कोणाला आवडण नाही परंतू औषध आणि ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्याने अनेकदा साइड इफेक्ट्सला सामोर जावं लागतं. अशात घरगुती उपाय फायदेशीर ठरतात.  यासाठी केवळ चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेऊन पाहा. पाण्याच्या वाफेमुळे आपल्या त्वचेमधील रक्त प्रवाह वाढतो आणि सोबत चेहऱ्यावरील रोमछिद्रे (ओपन पोअर्स) मोकळी होतात. गरम वाफेमुळे रोमछिद्रांमध्ये जमा झालेली दुर्गंध बाहेर फेकली जाते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

– चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ कशी घ्याल?
चेहऱ्यावर वाफ घेण्या साठी तुम्ही फेस स्टीमरचा वापर करू शकता. स्टीमर नसल्यास एका भांड्यामध्ये पाणी गरम करून घ्या. पाणी गरम झाल्यानंतर ते भांडे गॅसवरून खाली उतरवा. यानंतर डोक्यावर टॉवेल घेऊन चेहरा झाका. काळजीपूर्वी चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घ्या. पाण्याच्या वाफेमुळे चेहऱ्यावरील रोमछिद्रे मोकळी होण्यास मदत मिळते.
​​ब्लॅकहेड्सपासून सुटका
आपल्या त्वचेला नैसर्गिक स्वरुपात मॉइश्चराइझर मिळावे, यासाठी त्वचेतून नैसर्गिक स्वरुपात सीबमचा स्त्राव होतो. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल रोमछिद्रांमध्ये जमा होते. परिणामी मुरुम, ब्लॅक हेड्सच्या समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्यावर वाफ घेतल्यास ब्लॅकहेड्सची समस्या दूर करण्यासाठी मदत होते. या घरगुती ट्रीटमेंटमुळे ब्लॅकहेड्स काढताना तुम्हाला त्रास देखील होणार नाही.

 – त्वचा दिसते तरुण
चेहऱ्यावर वाफ घेतल्यानं आपल्याला काही अँटी एजिंग फायदे देखील मिळतात. ज्यामुळे तुमची त्वचा दीर्घ काळापर्यंत तरुण राहण्यास मदत मिळते. वाढत्या वयानुसार आपल्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे, सुरकुत्या इत्यादी बदल दिसू लागतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही गरम पाण्याची वाफ घेऊन पाहा. यामुळे त्वचेच्या पेशी दुरुस्त होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे चेहऱ्यावरील मृत त्वचेची समस्या देखील दूर होते. गरम पाण्याची वाफ घेतल्याने चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.

– क्लींझर प्रमाणे कार्य करते
चेहऱ्यावर वाफ घेण्याची प्रक्रिया ही परफेक्ट क्लींझर प्रमाणे कार्य करते. गरम पाण्याच्या वाफेमुळे त्वचेवर जमा झालेली दुर्गंध, मृत त्वचा आणि त्वचेच्या रोमछिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर फेकली जाते. चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असल्यास स्टीम घेताना काळजी घ्यावी. वाफेमुळे मेंदू रक्तवाहिन्यांना रक्त प्रवाह वाढवण्यासंदर्भात संकेत देतो. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील दिसू लागते.

– त्वचेवर क्रीम व लोशन लावल्यानंतर दिसतो चांगला परिणाम
चेहऱ्यावर गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर रोमछिद्र आतील बाजूने पूर्णपणे स्वच्छ होतात. यामुळे ब्युटी प्रोडक्ट शोषून घेण्याची त्वचेची क्षमता अधिक वाढते. स्टीम घेतल्यानंतर चेहऱ्यावर सीरम, फेस मास्क किंवा अन्य स्वरुपातील लोशन अथवा क्रीम लावल्यास त्वचा ते शोषून घेते. यामुळे चेहऱ्यावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. चेहऱ्याच्या भागामध्ये रक्त प्रवाह वाढल्यानंतर ऑक्सिजन आणि न्युट्रिएंट्स अधिक प्रमाणात चेहऱ्यापर्यंत पोहोचतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत