Land-Seat
लाइफफंडा

जमिनीवर बसण्याचे फायदे आहेत भरपूर; वाचा तर…

पुणे : सध्या असे काही लोक असतील की त्यांना जमिनीवर बसणं आवडतं. पण बरेच लोकं खुर्चीवर बसूनच आपले काम करतात. जर आपणही त्यापैकी एक आहात तर एकदा जमिनीवर बसण्याचे फायदे जाणून घ्या.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ज्या लोकांची बसण्याची पद्धत चांगली नसते, जमिनीवर बसून आपोआप त्यात सुधारणा येते. जमिनीवर बसून खांदे मागे ओढले जातात. ज्यामुळे आजू-बाजूचे स्नायू बळकट होतात. जमिनीवर बसल्याने शरीराची मुद्रा सुधारते. आतील स्नायूही बळकट होतात. जर आपल्याला पाठदुखीचा त्रास आहे तर जमिनीवर बसल्याने पाठदुखीची तक्रार देखील दूर होते.

जमिनीवर बसल्याने पाठीचा कणा ताणतो. ज्यामुळे शरीरात लवचिकपणा वाढतो. जे खुर्चीवर बसून होत नाही. बऱ्याच वेळ खुर्चीवर बसून गुडघ्यामागील शिरा ताठ होतात, ज्यामुळे त्या वेदनेला कारणीभूत असतात.

पचनक्रिया सुधारते

जमिनीवर बसून जेवल्याने पचनतंत्र सुरळीत राहत आणि अन्नपचन चांगले होते. ते असे की आपण जेवण्यासाठी पुढे वाकतो आणि नंतर गिळण्यासाठी मागे जातो. तेव्हा आपण पुढे मागे जातो आणि या प्रक्रियेत पोटाच्या स्नायूंवर दाब पडतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत