Vegitables
लाइफफंडा

कॅन्सरपासून दूर राहायचंय? तर ‘हे’ खा अन् राहा स्वस्थ

नवी दिल्ली : जगभरात कॅन्सरचे रुग्ण पाहिला मिळतात. कॅन्सर म्हणजेच कर्करोग. या कर्करोगापासून दूर राहावे यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. त्यामुळे अनेकजण आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देत असतात. त्यापासून वाचण्यासाठी घरगुती गोष्टींचा वापर केल्यास वाचता येऊ शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कॅन्सरपासून दूर राहण्यासाठी अँटी-फूड्स महत्त्वाचे असतात. या फूड्सच्या नियमित सेवनाने कॅन्सर होण्याचा धोका अनेकपटीने कमी होऊ शकतो.

ग्रीन/हर्बल टी : ग्रीन आणि हर्बल टीमध्ये एंटी व्हायरल, एँटी ऑक्सिडेंट, एँटी बॅक्टेरिअल असते. रोज 2-3 कप ग्रीन आणि हर्बल टी प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढते. त्यामुळे कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो.

फळे आणि पालेभाज्या : नियमित फळे आणि पालेभाज्या आहारात ठेवल्यास विटॅमिन आणि मिनरल्स नक्कीच मिळू शकतात. दररोज हे सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. तसेच पालेभाज्या आणि फळांचा रस करून प्यायल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो.

टमाटे : टमाट्यात एँटी-ऑक्सिडंट, एँटी व्हायरल गुण आहेत. त्यामुळे कॅन्सरपासून लढण्यास शक्ती मिळू शकते. दररोज भाज्यांमध्ये टाकून किंवा कच्चा टमाटा खाल्ल्यास याचा फायदा होतो. टमाटा खाल्ल्याने 18 टक्के कॅन्सरचा धोका टाळता येऊ शकतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत