5000mAh ची बॅटरी असणाऱ्या विवोच्या ‘या’ नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू
लाइफफंडा

5000mAh ची बॅटरी असणाऱ्या विवोच्या ‘या’ नव्या स्मार्टफोनची विक्री सुरू

नवी दिल्ली : विवो इंडियाने आपला विवो Y20A स्मार्टफोन देशात विक्रीसाठी लाँच केला आहे. विवोच्या या नवीन फोनमध्ये 6.51 इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह 5000mAh ची बॅटरी मोठी आहे. Vivo Y20A दोन रंगांच्या रूपांमध्ये सादर करण्यात आले आहे. फोनची ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरमधून सुरू झाली आहे. Vivo Y20A बॅटरीवर 17 तासांचा एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंगचा कंपनीने दावा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Vivo Y20A किंमत
3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह असणाऱ्या Vaivo Y20A ची किंमत 11,490 रुपये आहे.Vivo Y20A निबुला ब्लू आणि डाऊन व्हाईट कलर व्हेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. फोनला ड्युअल सिम सपोर्ट आहे. याशिवाय अँड्रॉइड 11 आधारित फनटच ओएस 11 देण्यात आला आहे. Vivo Y20A मध्ये 6.51-इंचाचा एचडी + आयपीएस डिस्प्ले मिळेल ज्याचा रिझोल्यूशन 720×1600 पिक्सल आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर, 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे, जो मेमरी कार्डच्या मदतीने वाढविला जाऊ शकतो.

Vivo Y20A चे फीचर्स
ड्यूल सिम असलेला हा Vivo Y20A स्मार्टफोन अँड्रॉयड ११ बेस्ड फन टच ओएस ११ वर काम करतो. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.फोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३९ प्रोसेसर आणि ३ जीबी रॅम दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येवू शकते. स्मार्टफोनमध्ये रियरवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे.

फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. १० वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाय फाय, एफएम रेडियो, मायको यूएसबी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक यासारखे फीचर्स दिले आहेत.