लाइफफंडा

एनिमेटेड स्टिकर पासून सर्च ऑप्शनपर्यंत व्हॉट्सअॅपमध्ये लाँच करतेय नवीन फीचर्स 

नवी दिल्लीः जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅपवर काही नवे फिचर्स अॅड केले जाणार आहेत. WABetaInfo च्या एक रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅप आपल्या अँड्रॉयड अॅपसाठी नवीन एनिनमेटेड स्टिकर पॅक जारी करणार आहे. गेल्या काही दिवसात ऑलवेज म्यूट बटन, न्यू स्टोरेज यूसेज आणि कॅटलॉग शॉर्टकट सारख्या फीचर्स संबंधी ऐकायला मिळाले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका अहवालाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपने सुरवातीला काही निवडक युजर्ससाठी हे फीचर जारी केले आहेत. त्या युजर्सना त्यांना अॅपच्या स्टीकर पर्यायात नवीन सर्च आयकॉन दिसतील.  व्हॉट्सअॅपने तयार केलेल्या या स्टिकर पॅकचे नाव ‘बेबी शार्क’ असून त्याची साईज ३.४ एमबी इतकी असणार आहे. नवीन स्टिकर पॅक शिवाय लवकरच हे अॅप स्टिकर सर्च फीचर येणार आहेत. या फीचर द्वारे व्हॉट्सअॅप युजर्सला अॅपमध्ये स्टिकर सर्च करण्याची सुविधा मिळणार आहे.

त्याचबरोबर,  व्हॉट्सअॅप मध्ये नवीन इन अॅपसपोर्ट फीचर्सही येत आहे. व्हॉट्सअॅप सपोर्ट चॅट एक  अधिकृत चॅट असणार आहे. तसेच दुसऱ्या चॅट्सप्रमाणे यात अँड टू अँड इनस्क्रिप्शनची सुविधा मिळणार आहे.याद्वारे युजर्सना काही समस्या येत असल्यास या अॅपच्या अधिकृत सपोर्ट टीम सोबत व्हॉट्सअॅप चॅटद्वारे कम्यूनिकेट करू शकतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत