ATM
लाइफफंडा

एटीएम कार्ड नसतानाही येतीये कॅश काढता; कसं तर हे वाचा…

नवी दिल्ली : सध्या डेबिट कार्ड म्हणजेच आपलं एटीएम कार्ड असले की आपल्या खात्यातील कितीही रक्कम, हवी तेव्हा काढता येते. पण तेच एटीएम कार्ड पैसे काढताना सोबत नसले तरीही पैसे काढता येतात, हे आत्तापर्यंत काही जणांनाच माहिती असेल. पण काही बँका एटीएम कार्डशिवाय पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एटीएम कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढणे याला ‘कार्डलेस कॅश’ म्हटले जाते. हीच सुविधा आता काही बँकांनी देण्याचे सुरु केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बदोडा आणि आयसीआयसीआय या बँकांनी ही सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार एटीएम मशिनमधून एटीएम कार्डशिवाय पेसै काढता येतात.

असे काढा कार्डशिवाय पैसे…

– सर्वात आधी बँक डेबिड कार्डशिवाय एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देते की नाही हे तपासा.

– जर बँक सुविधा देत असेल तर त्याचं ऍप डाऊनलोड करा.

– SBI ग्राहक असल्यास YONO ऍप डाऊनलोड करा.

– ‘Yona Cash’ या पर्यायात जा, त्यानंतर ‘cash on mobile’ पर्यायावर क्लिक करा.

– Bank of Baroda चे ग्राहक असल्यास BOB MConnect Plus ऍप डाऊनलोड करा.

– त्यानंतर ‘card-less cash withdrawal’वर क्लिक करा

– त्यानंतर जितकी रक्कम काढायची आहे ती टाईप करा.

– ट्रान्झक्शन OK करा आणि नंतर बँकिंग ऍपचा PIN टाका

– बँकेकडून एक OTP रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर येईल, हा OTP काही वेळासाठीच असेल.

– त्यानंतर बँकेच्या ATM मध्ये ‘card-less cash withdrawal’ पर्याय निवडा.

– मोबाईल नंबर टाका, रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP टाका.

– त्यानंतर तिच रक्कम टाका जी मोबाईल ऍपमध्ये टाकली आहे. त्यानंतर तुम्हाला ती रक्कम मिळेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत