पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पन्हाळगड शिवकालीन पुनर्निर्मित पहिला किल्ला असेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर, दि. ०६: महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. तसेच जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील १३ डी थिएटर चे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण झाले त्यावेळी ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार गोपिचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी समीर शिंगटे, पन्हाळा नगरपालिका मुख्याधिकारी चेतन माळी आदी मान्यवर उपस्थित होते.