कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट; २४ तासात ३०६ मृत्यू

मुंबई : मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. मात्र आता एक दिलासादायक बातमी समोर येत असून कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या दोन लाखांपेक्षा कमी झाली आहे. राज्यात आता १ लाख ८९ हजार ७१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ११ हजार ४४७ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या १५ लाख ७६ हजार ६२ इतकी झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांमध्ये १३ हजार ८८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १३ लाख ४४ हजार ३६८ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ३०६ रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत ४१ हजार ५०२ रुग्णांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ३०६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यू दर २.६३ टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या ७९ लाख ८९ हजार ६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५ लाख ७६ हजार ६२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. महाराष्ट्रात सध्या २३ लाख ३३ हजार ५२२ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर २३ हजार ४०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत