विरार येथे रुग्णालयाला आग लागून १३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
बातमी मुंबई

विरार येथे रुग्णालयाला आग लागून १३ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

विरार : नाशिक दुर्घटनेत २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्यानंतर विरारमध्ये एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

मृतांची नावं
१) शमा अरुण म्हात्रे- (स्त्री: ४८वर्ष)
२) सुवर्णा एस पितळे- (स्त्री: ६४ वर्ष)
३) सुप्रिया देशमुख- (स्त्री: ४३ वर्ष)
४) रजनी आर कडू – (स्त्री : ६० वर्ष)
५) नरेंद्र शंकर शिंदे – (पुरुष : ५८ वर्ष)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे- (पुरुष: ६३ वर्ष)
७) कुमार किशोर दोशी- (पुरुष : ४५ वर्ष)
८) रमेश टी उपयान- (पुरुष: ५५ वर्ष)
९) प्रविण शिवलाल गोडा – (पुरुष: ६५ वर्ष)
१०) अमेय राजेश राऊत- (पुरुष: २३ वर्ष)
११) उमा सुरेश कनगुटकर- (स्त्री : ६३ वर्ष)
१२) निलेश भोईर- (पुरुष : ३५ वर्ष)
१३) पुखराज वल्लभदास वैष्णव – (पुरुष : ६८ वर्ष)