मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी
बातमी मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; १४ जखमी

मुंबई : डहाणू तालुक्यात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी टोल नाक्यावर सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास लक्झरी बस व कंटेनरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघाता १४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रात्री साडे बाराच्या सुमारास प्रवासी घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसचा अचानक ब्रेक फेल झाल्याने चारोटी टोल नाक्यावर पुढे उभ्या कंटेनरला धडक देऊन भीषण अपघात झाला. सदर बस ही मुंबईहून गुजरातच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी १४ प्रवाशी किरकोळ जखमी झाले, तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

दरम्यान, ब्रेक निकामी झाल्याने वेळेवर प्रसंगावधान साधून चालकाने बस रोखण्याच्या प्रयत्नात उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. यामध्ये चालकाला गंभीर दुखापत झाली. जखमींमध्ये किंजल पटेल (चालक) वय ३५, जयवंत भाई चव्हाण (३७), अश्विान चव्हाण (३४), सुरेश भाई परमार वय (४७), जिग्नेश भाई चव्हाण (३१), अरुण भाऊ चावडा (४५), महेश राठोड (४२), नरेश सोळंकी (३७), शिल्पा सोळंकी (३४), दबलभाई परमार (४१), पूनम आव्हाड (३१), संजय गुप्ता (३९), फ्रँकलिन ख्रिसमस (४८), नितीन कुमार परमार (४८) यांचा समावेश आहे.