दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक
देश बातमी

दिल्लीत मोदींविरोधात पत्रके चिकटवल्याने १५ जणांना अटक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोरोना लसीकरणाबाबत टीका करणारी पत्रके चिकटवल्याने दिल्ली पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे. भित्तिपत्रकांत मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यू भेज दिया असे म्हटले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटले आहे, की आणखी गुन्हे दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. चौकशी सुरू असून कुणाच्या वतीने ही भित्तिपत्रके चिकटवण्यात आली याचा शोध घेतला जात आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

मोदी यांच्या विरोधातील भित्तिपत्रके शहरात अनेक ठिकाणी चिकटवण्यात आली होती. भादंवि १८८ तसेच मालमत्ता विद्रुपीकरणविरोधी कायद्यानुसारही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.