देश बातमी

भारतीय युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेणाऱ्या १५ जणांना एनआयए न्यायालयाकडून शिक्षा

नवी दिल्ली : भारतात तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर नेण्याऱ्या 15 जणांना न्यायालयाने 10 वर्ष, 7 वर्ष आणि 5 वर्ष अशा वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. भारतात आयसीसचं (ISIS) नेटवर्क उभं करणे आणि भारतीय युवकांना दहशतवादाच्या मार्गावर नेणे, या गंभीर आरोपांखाली 15 जणांच्या विरुध्द दिल्लीतील विशेष न्यायालयाने आज (17 ऑक्टोबर) हा मोठा निर्णय दिला. याशिवाय संबंधित दोषींना आर्थिक दंड भरण्याचीही शिक्षा ठोठावली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारतात आयसीसचं नेटवर्क उभं करत दहशतवादी कृत्य करण्यासाठी सोशल मीडियावर मुस्लीम युवकांची दिशाभूल केल्याचे, दहशवाद विरोधी पथकाच्या तपासात स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या उच्च अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी 2015 मध्ये वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. काही लोक दहशतवादी संघटना आयसीसच्या इशाऱ्यावरुन भारतात त्यांच्यासाठी सहयोगी संघटना उभ्या करत असल्याचा आरोप होता. या संघटनेचं नाव जुनेद-उल-खलिफा ठेवण्यात आलं होतं. या संघटनेचे प्रमुख भारतातील युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणी देऊन दिशाभूल करत होते. यानंतर या युवकांना दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा कटही होता.

दोषी सर्व 15 आरोपींवर भारतात दहशतवादी संघटना आयसीसीचं नेटवर्क उभं करण्याचा आरोप होता. त्यांनी . विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रविण सिंह यांनी या प्रकरणातील मुख्य दोषी नफीस खानला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. त्याशिवाय इतर तिघांना प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा सुनावली. या कामात मदत करणाऱ्या अन्य एका दोषीला न्यायालयाने 6 वर्षांची शिक्षा सुनावली. तुरुंगवासासोबतच या दोषींना आर्थिक दंडाचीही शिक्षा मिळाली आहे. एनआयए विशेष न्यायालयाने (NIA Specail Court) दोषींना 30 हजार रुपयांपासून 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत दंड भरण्याची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी दोषीचे वकील कौसर खान म्हणाले, “न्यायालयाने अबु अनस, मुफ्ती अब्दुल समी कासमी आणि मुदब्बिर मुश्ताक शेख यांना 7 वर्षांची, तर अमजद खानला 6 वर्षांची शिक्षा सुनावली. अब्दुल्ला खान, नजमुल हुदा, मोहम्मद अफजल, सुहैल अहमद, मोहम्मद अलीम, मोइनुद्दीन खान, आसिफ अली आणि सैय्यद मुजाहिद यांना 5 वर्षांची शिक्षा झाली आहे.

दरम्यान गुप्तचर विभागाच्या माहितीद्वारे, केलेल्या या कारवाईत एनआयएने एकूण 19 जणांना अटक केली होती. या संघटनेचा भारतातील प्रमुख आयसीसचा प्रमुख मानला जाणाऱ्या यूसुफ अल हिंदी उर्फ अरमान उर्फ अनजान भाई यांच्या इशाऱ्यावर काम करत होता. या लोकांना अटक केल्यामुळे आयसीसमध्ये भरती होण्यासाठी निघालेल्या अनेक युवकांची माहिती मिळाली. त्यानंत त्या युवकांनाही पकडून भारतात परत आणण्यात यश आलं आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत