पुणे बातमी

पुण्यातील दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू; राज्यापाठोपाठ केंद्राकडून मदत जाहीर

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील औद्योगिक वसाहतीत आगीची मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये 16 महिला कामगार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

प्राथमिक माहितीनुसार, 37 पैकी काही कामगार बाहेर पडले. तर 10 कामगारांना बाहेर काढण्यात यश मिळाले. मात्र, 18 कामगार अडकले होते. नंतर या सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

केंद्रासह राज्याकडून आर्थिक मदत जाहीर..
राज्य सरकारने या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत घोषित करण्यात आली आहे.

दुर्घटनेतील मृतांची नावे :
अर्चना कवडे, संगीता गोंदे, मंगल मोरगाळे, सुरेखा तुपे, सुमन ढेरे, सुनीता साठे, संगीता पोळेकर, माधुरी अंबोरे, मंदा कुलत, त्रिशाला जाधव, अतुल साठे, सीमा बोराडे, गीता दिवाडकर, शीतल खोपकर, सारिका कुडाळे, धनश्री शेलार, सचिन घोडके.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *