कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या २० हजारांच्या खाली

नवी दिल्ली : देशभरात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल २०१ दिवसांनी २० हजारांच्या खाली नोंदवण्यात आली आहे. २६ सप्टेंबरला देशभरात २६ हजार ४१ करोना रुग्णांची आणि २७६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी देशात १८ हजार ७९५ बाधितांची नोंद झाली असून १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दोन दिवसांपासून देशातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील ३ लाखांपेक्षा कमी झाली आहे. देशात सध्या २ लाक ९२ हजार २०६ रुग्ण उपचाराधीन आहेत. नवीन रुग्णसंख्येसह देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३६ लाख ९७ हजार ५८१ झाली आहे. तर, आतापर्यंत ३ कोटी २९ लाख ५८ हजार २ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर, ४ लाख ४७ हजार ३७३ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत १ कोटी २ लाख २२ हजार ५२५ जणांना करोना लस देण्यात आली असून आतापर्यंत ८७ कोटी ७ लाख ८ हजार ६३६ जणांचं लसीकरण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *