पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के
पश्चिम महाराष्ट्र बातमी

पश्चिम महाराष्ट्राला भूकंपाचे धक्के

कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावाचे आधीच मोठे संकट असताना पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. कोयना धरण व परिसराला शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता २.९ व ३.०० रिश्टर स्केल अशी नोंदली गेली. पहिला धक्का २.५५ मिनिटांनी तर, तर भूकंपाचा दुसरा धक्का लगेचच ३ ते ४ मिनिटांच्या अंतराने जाणवला. दोन्ही धक्क्यांच्या लहरी सौम्य असल्याने कुठेही कसलीही हानी झाली नाही. मात्र, जमीन थरथरल्याने लोक घराबाहेर पळाले.

भूकंपाच्या धक्क्याचे केंद्रबिंदू वारणा खोऱ्यात जावळे गावाच्या वायव्येला ८ किमी अंतरावर तसेच कोयना धरणापासून १३.६ किमी अंतरावर होते. या भूकंपांचे केंद्रबिंदू जवळपास ८ किमी खोल असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.