भयानक ! भंडाऱ्यातील परिस्थिती वाईट; लाईनमध्येच रचून ठेवल्या आहेत चिता
बातमी विदर्भ

भयानक ! भंडाऱ्यातील परिस्थिती वाईट; लाईनमध्येच रचून ठेवल्या आहेत चिता

भंडारा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भंडारा जिल्ह्यात परिस्थिती अतिगंभीर होताना दिसत असून भंडाऱ्याच्या स्मशानभूमीचं भयावह चित्र समोर आलं आहे. भंडारा स्मशानभूमीत मृत्यूपूर्वीच सरण रचून ठेवण्याची दुर्देवी वेळ भंडारा प्रशसानावर आली असून एकाच वेळी 20-25 कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भंडारा जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. भंडारा शहरालगत गिरोला स्मशानभूमी रोज 20 ते 25 लोकांवर अंतसंस्कार केले जात आहे. कुणाला अंत्यसंस्करासाठी ताटकळत राहण्याची वेळ येऊ नये म्हणून आता भंडारा जिल्हा प्रशासनाकडून आधीच सरण रचून ठेवले जात आहे. त्यासाठी दररोज 2 ते 3 ट्रक लाकुड लागत आहे.

भंडारा नगर परिषदेचे 5 कर्मचारी अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करीत आहेत. हे चित्र पाहून अनेकांच्या भावना दाटून येत असून स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्यामुळे आता चक्क जमिनीवरच सरण रचण्यात येत आहे. तर स्मशानभूमीच्या परिसरात नातेवाईक थांबलेले असतात. आपल्या नातलगाच्या मृतदेहवर होणारे अत्यसंस्कार दूरूनच पाहून अखेरचा निरोप देत आहे.