कोरोना इम्पॅक्ट बातमी

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरुच; एकूण रुग्णसंख्या १० लाखांच्या घरात

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता १० लाखांच्या घरात गेली आहे. महाराष्ट्रात आता एकूण कोरोनाचे रुग्ण ९ लाख ९० हजार ७९५ इतके आहेत. तर महाराष्ट्रात मागील २४ तासांत २३ हजार ४४६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर, मागच्या २४ तासांत राज्यात ४४८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २४ तासांमध्ये १४ हजार २५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण डिस्टार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता ७ लाख ७१५ झाली आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात कोरोनामुळे २८ हजार २८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला महाराष्ट्रात २ लाख ६१ हजार ४३२ अॅक्टिव्ह केसेस आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, आजपर्यंत राज्यात ४९ लाख ७४ हजार ५५८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. सध्या राज्यात १६ लाख ३० हजार ७०१ व्यक्ती होम क्वारंटाइन आहे तर ३८ हजार २२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ७०.७२ टक्के इतके झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत