धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
देश बातमी

धक्कादायक! ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील नाशिकमध्ये घडलेल्या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडलेली असताना दिल्लीमधील गंगाराम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या २५ रुग्णांचा गेल्या २४ तासात ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने मृत्यू झाला आहे. रुग्णालयाकडूनच ही माहिती देण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सध्या दोन तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक असून ऑक्सिजनवर असणाऱ्या ६० हून अधिक रुग्णांचा जीव धोक्यात आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.

अनेक राज्यांप्रमाणे दिल्लीतही अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे. गंगाराम रुग्णालय हे दिल्लीमधील खासगी रुग्णालयांमध्ये असून ६७५ बेड्सचं एक नामांकित रुग्णालय आहे. मात्र तिथेही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून २५ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. व्हेटिंलेटर नीट काम करत नाही आहेत. आयसीयू आणि एमजर्नसीमध्ये सध्या मॅन्यूअल व्हेटिंलेशन सुरु आहे. मोठ्या दुर्घटनेची शक्यता आहे. ६० रुग्णांचा जीव सध्या सध्या धोक्यात असून तात्काळ मदतीची गरज आहे. रुग्णालयाने तात्काळ ऑक्सिजन एअरलिफ्ट करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.