देश बातमी

धक्कादायक ! जेवणाला हात लावल्याच्या कारणावरुन दलित तरुणाची हत्या

भोपाळ : जेवणाला हात लावला म्हणून एका दलित तरुणाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यात घडला आहे. देवराज अनुरागी असं या मृत तरुणाचे नाव असून तो छत्तरपूरचा रहिवाशी होता. देवराजने फक्त जेवणाला हात लावला म्हणून संतापलेल्या दोन तरुणांनी त्याला बेदम मारहाण केली, यामध्ये त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फरार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मृत तरुण देवराजला छत्तरपूरमधील किशनपूर गावात होणाऱ्या एका पार्टीमध्ये साफ सफाईच्या कामासाठी बोलवण्यात आले होते. भूरा सोनी आणि संतोष पाल अशी या प्रकरणातील आरोपींची नावं असून या दोघांनीच देवराजला कामासाठी बोलावले होते. देवराज पार्टी संपल्यानंतर स्वत:साठी जेवण घेत होता. त्यावेळी सोनी आणि पाल यांनी त्याला प्रथम शिवीगाळ केली. त्यानंतर त्याला काठीनं बदडलं, या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार घडला तेंव्हा दोन्ही आरोपी दारुच्या नशेत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोनी आणि पाल हे दोन्ही आरोपी या प्रकरणानंतर फरार आहेत. त्यांच्यावर हत्या आणि एससी-एसटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा घडला ते मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून दूर असून उत्तर प्रदेशच्या सीमेवर आहे. दोन्ही आरोपींचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत तरुण देवराज हा छत्तरपूरच्या एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा होता. त्याचा मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *