पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगाऱ्यां अटक
पुणे बातमी

पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगाऱ्यां अटक

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाईल कारवाई केली आहे. भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील निंबोडी रस्त्यावर असणाऱ्या डोंगराजवळ जुगार अड्डा हनुमंत माणिक थोरात चालवत असल्याची माहिती गोपनीय खबऱ्यामार्फत पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार भिगवण पोलिसांनी रिमझिम पाऊस चालू असताना पोलिसांनी अगदी फिल्मी स्टाईलने या ठिकाणी प्रवेश करत जुगार अड्यावर छापा मारून कारवाई केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जुगाऱ्यांच्या पळून जाण्याच्या प्रयत्नावर विरंजन पडत शासकीय नोकर, एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष, नामवंत वस्ताद आणि व्हाईट कॉलर नागरिकासह एकूण २६ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ८ टेबलावर खेळवल्या जाणाऱ्या अड्ड्यावर १लाख १२ हजार ७८० रोख रकमेसह एकूण ३ लाख १२ हजार ७८० रुपयाचा ऐवज पोलिसांकडून जप्त करण्यात आला.

यामध्ये बारामती, इंदापूर, दौंड, कर्जत, फलटण, माळशिरस अशा ६ तालुक्यातील २६ जुगारी खेळत होते. आपले नाव जुगाऱ्याच्या यादीतून काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही पोलिसांनी कारवाईत कोणालाही सोडले नाही. सदरची कारवाई भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने आणि त्यांच्या पथकाने केली आहे.