देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट; मृत्यूदर १.३४ टक्क्यांवर कायम
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट; मृत्यूदर १.३४ टक्क्यांवर कायम

नवी दिल्ली : देशातील नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सोमवारी मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले. मागील २४ तासांत देशात ३० हजार ९४१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ७० हजार ६४० वर पोहोचली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कालावधीत कोरोनामुळे ३५० जण मृत्युमुखी पडल्याने कोरोना मृत्यूंचा एकूण आकडा ४ लाख ३८ हजार ५६० इतका झाला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे. त्यामुळे मृत्युदर १.३४ टक्के इतका आहे.

उपचाराधीन रुग्णांची संख्या ३ लाख ७० हजार ६४० पर्यंत वाढली असून ती एकूण कोरोनाबाधितांच्या १.१३ टक्के आहे. तर, एकूण ३ कोटी १९ लाख ५९हजार ६८० लोक आतापर्यंत बरे झाले असून हे प्रमाण ९७.५३ टक्के इतके आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत करोना प्रतिबंधक लशींच्या एकूण ६४ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत.