राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे
देश बातमी

राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे बसले आहेत. राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा हा भूकंप झाला असून दिल्ली-एनसीआरपर्यंत त्याचे हादरे जाणवले आहेत. रात्री ११ वाजून ४६ मिनिटांनी झालेल्या हा मध्यम स्वरुपाचा हा भूकंप ४.२ रिश्टर स्केल इतका होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवू लागल्यानंतर लोकं आपल्या घरातून बाहेर पडले होते. अलवार हे भूकंपाचे मुख्य केंद्र होते अशी माहिती राष्ट्रीय भूकंप केंद्राकडून देण्यात आली आहे.

https://twitter.com/Divay/status/1339639113666859009

रिश्टर स्केल ४.२ तीव्रतेच्या या भूकंपाचं केंद्र हरियाणाच्या गुरुग्रामपासून ४८ किमी दूर होते. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. ट्विट, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लोकांनी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाजियाबाद या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं म्हटलं आहे.

https://twitter.com/Weatherford2609/status/1339750394302320640