चिंताजनक ! देशातील कोरोना रुग्णांची पुन्हा वाढली संख्या
कोरोना इम्पॅक्ट बातमी

चिंताजनक ! देशातील कोरोना रुग्णांची पुन्हा वाढली संख्या

नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढताना दिसत असून गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एकीकडे नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमुळे चिंता वाढली असली, तरी कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीमुळे आरोग्य प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्यात २४ तासांमध्ये एकूण ४२ हजार ००४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ इतका झाला आहे.

आत्तापर्यंत भारतात एकूण ४ लाख १३ हजार ६०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या जरी जास्त दिसत असली, तरी त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख २२ हजार ६६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशभरात होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्युशनल आयसोलेशनमध्ये लक्षणं नसलेले बाधित असून लक्षणं असलेले किंवा परिस्थिती खालावलेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.