50 लाखांचं सोनं कंडोममध्ये घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; मुंबईत महिलांचा प्रताप
बातमी मुंबई

50 लाखांचं सोनं कंडोममध्ये घालून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं; मुंबईत महिलांचा प्रताप

मुंबई : मुंबई विमानतळावरुन तस्करीच्या नवनव्या कल्पनांचा अवलंब करून गुन्हेगारी केली जात आहे. मुंबई विमानतळावरुन नुकतीच एनसीबीने तीन महिलांना अटक केली आहे. या महिलांनी ज्या पद्धतीचा वापर केला होता त्यानंतर अधिकारीही हैराण झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एनसीबीच्या मुंबई टीमने विमानतळावरुन तीन महिलांना अटक केली आहे. स्कॅनिंगदरम्यान महिलांच्या पोटातून तब्बल 50 लाखांहून अधिक किमतीचं सोनं सापडलं आहे. या महिलांनी कंडोममध्ये सोनं भरून प्रायव्हेट पार्टमध्ये लपवलं होतं. यातून तब्बल 1 किलो सोन ताब्यात घेण्यात आलं आहे.

एनसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही महिला पँटमध्ये ड्रग्ज लपवून आणत असल्याची टीम त्यांना मिळाली होती. मात्र स्कॅनिंगमध्ये ड्रग्ज ऐवजी सोनं सापडलं. या महिला केनियातील नागरिक असून त्या केनियाहून कतारला गेल्या आणि त्यानंतर मुंबईला आल्या होत्या. एनसीबीने त्या तीन महिलांना कस्टम्सकडे सोपवलं आहे.