धक्कादायक! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडुन ५७ जणांचा मृत्यू
बातमी विदेश

धक्कादायक! आफ्रिकन स्थलांतरितांची बोट समुद्रात बुडुन ५७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : आफ्रिकन स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट लिबियाच्या समुद्रात बुडाली आहे. या दुर्घटनेमध्ये ५७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण किनारपट्टीला लागून असलेल्या खूममधून ही बोट रविवारी निघाली होती. या बोटीवर महिला आणि लहान मुलांसह ७५ जण होते. या दुर्घटनेत ज्या ५७ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी २० महिला असून २ लहान मुलं असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत संघटनेकडून देण्यात आली आहे. इंडिया टुडेने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या दुर्घटनेमधून १८ जणांना वाजवण्यात आलं असून त्यांना किनाऱ्याकडे पाठवण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. या वाचलेल्यांपैकी काही जण नायजेरिया, घाना आणि गँबिया भागातले आहेत. त्यांनी सांगितलं की, इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे ही बोट मधेच बंद पडली आणि वातावरण खराब असल्याने ती बुडाली.

गेल्या आठवड्यातली बोट बुडाल्याची ही दुसरी दुर्घटना आहे. यापूर्वीही स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली होती, ज्यात किमान २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली होती.