पुणेकरांची फसवणूक ! पीएम केअर फंडातील 58 व्हेंटिलेटर निघाले खराब
पुणे बातमी

पुणेकरांची फसवणूक ! पीएम केअर फंडातील 58 व्हेंटिलेटर निघाले खराब

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून पुणेकरांची एकप्रकारे फसवणूक झाली आहे. पीएम केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर खराब निघाले आहेत. याबाबत ससून रुग्णालयाचे डिन डॉ. मुरलीधर तांबे यांनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आढावा बैठकीत तक्रार केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएम केअर फंडातून मिळालेले व्हेंटिलेटर सारखे बंद पडतात, व्हेंटिलेटर पूर्ण क्षमतेनं चालत नसल्याने धूळ खात पडून आहेत, अशी तक्रार करण्यात आली आहे. यामुळे व्हेंटिलेटरच्या गुणवत्तेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत केंद्र सरकारकडूनच ससूनला व्हेंटिलेटर मिळाले होते. मात्र, हे व्हेंटिलेटर बंद पडत असल्याने निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आरोग्य सुविधांवरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगत असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली असून आता त्यावरून राजकीय वाद चांगला पेटण्याची शक्यता आहे.