महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या 6 जणांना अटक
देश बातमी

महंत गिरी यांच्या मृत्यूप्रकरणी राजकीय पक्षाशी संबंध असणाऱ्या 6 जणांना अटक

प्रयागराज : आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी प्रयागराज पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. या सर्व लोकांची चौकशी केली जात असून यांचा कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या सुरक्षेतील गनरचीही चौकशी केली जाणार असून महंत यांना Yश्रेणी सुरक्षा मिळाली होती, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह प्रयागराजमधील बाघंबरी मठ याठिकाणी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर खोलीचा तपास केला असता एक सुसाइड नोट सापडली होती. या नोटमध्ये त्यांनी शिष्य आनंद गिरी यांचा त्यांच्यामुळे महंत तणावात असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आता महंत यांचे शिष्य आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांना मोबाईलचा कॉल डिटेल अहवाल प्राप्त झाला आहे, ज्यात अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या 6 ते 10 तासांपूर्वी ज्यांनी महंत यांच्याशी संभाषण केले आहे त्या सर्वांची पोलीस चौकशी करतील. प्रयागराज पोलिसांना महंत यांच्या मृत्यूबाबत एक व्हिडीओही मिळाला आहे, ज्याची चौकशी केली जात आहे. महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्यात वाद झाला होता. त्याच्या मृत्यूला या वादाशी जोडून पोलिसही तपास करत आहेत.