नगर : शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेलेल्या ८०वर्षांच्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात नगरजवळील रतडगाव येथे ही घटना घडली होती. नाना चंदु निकम (वय २१ रा. रतडगाव, नगर) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दहा वर्षे सक्त मजुरी व २८ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
दंडाच्या रकमेतून १५ हजार रुपये त्या ज्येष्ठ महिलेला दिलासा म्हणून देण्याचा आदेशही कोर्टाने दिला आहे, अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील अॅड. मंगेश दिवाणे यांनी दिली. आरोपीने ज्येष्ठ महिलेला गलोरीने दगड मारून खाली पाडले. तिच्यावर अत्याचार केले. तिच्या गुप्तांगाला दुखापत केली होती. जिल्हा न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी या आरोपीला शिक्षा दिली आहे.
नगर तालुक्यातील रतडगाव येथे ८ मार्च २०२० रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली होती. ८० वर्षीय ज्येष्ठ महिला पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती. ती पाणी भरत असताना आरोपी नाना चंदु निकम याने गलोरीने महिलेच्या तोंडावर दगड मारला. नंतर तिची मान पिरगळुन तिला खाली पाडले आणि अत्याचार केला. तिच्या गुप्तांगावर नखांनी जखमा केल्या. यावेळी महिला जोरजोरात ओरडत होती. तिचा आवाज ऐकून तिच्या सुना मदतीला धावल्या. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस स्टेशनला आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास फौजदार डी. आर. जारवाल यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली.